टीव्ही बघणे कमी कर... छान जगणे सुरु कर..
पाहिलास का कुठल्या नदीचा काठ
सुबक तो एखादा देखणा घाट
चालून बघ तो हिरवा डोंगर....छान जगणे सुरु कर...
वाचलंस का सध्या नवीन पुस्तक
पाहिलंस का छानसे एकतरी नाटक
अनवाणी चाल त्या ओल्या पुळणीवर.... छान जगणे सुरु कर...
घरट्यातील पक्षी जरा निरखून बघ
ढगामध्ये हत्ती कधी शोधून बघ
अंगावर घेरे कधी पावसाची सर.... छान जगणे सुरु कर..
रानामधली करवंदे शोधून खा
चुलीवरती भाकरी भाजून पहा
आयुष्य असले जरी अवघड
एकातरी गरिबाला मदत कर....छान जगणे सुरु कर...
छान जगणे सुरु कर..
--- सुधांशु नाईक, कल्याण. (०९८३३२९९७९१)