पुन्हा एकदा आभाळ भरून येईल ..
आणि बरसतील टपोरे थेंब..
दरवळेल तो गंध मातीचा..
माझीच आठवण मग येईल तुला....
आणि बरसतील टपोरे थेंब..
दरवळेल तो गंध मातीचा..
माझीच आठवण मग येईल तुला....
गवताचा तो वेडा ओला गंध..
बेभान वारा आणि पाउस धुंद ...
धबधब्याखाली त्या चिंब भिजताना
माझीच आठवण मग येईल तुला....
बुरुजावर कुठल्या उभे राहून
घेशील वारा हृदयात भरून
अचानक येईल जेंव्हा धुके दाटून..
माझीच आठवण मग येईल तुला....
आठवतील ते अवघे देखणे क्षण
वेडी भटकंती आणि वेडे आपण..
घरातूनही जेंव्हा पाउस बघशील
माझीच आठवण मग येईल तुला...
---सुधांशु नाईक, कल्याण - ०९८३३२९९७९१.
( nsudha19@gmail.com)वेडी भटकंती आणि वेडे आपण..
घरातूनही जेंव्हा पाउस बघशील
माझीच आठवण मग येईल तुला...
---सुधांशु नाईक, कल्याण - ०९८३३२९९७९१.