तू वेडा... मस्त रंगात
येणारा...
तू हलकट.. अगदी त्रासून
सोडणारा...
तू मूर्ख ... पाहिजे
तेंव्हा जवळ नसणारा...
तरीही तू जिवलगच....पुन्हा पुन्हा हवासा वाटणारा ....तू धसमुसळा... माझी पार भंबेरी उडवणारा...
तू बालिश...वेडावाकडा भरकटत
जाणारा...
तू हट्टी ... मनसोक्त गोंधळ
घालणारा...तरीही तू हळवा...पुन्हा पुन्हा कुशीत घेत जपणारा....
तू अजागळ... हल्ली बेशिस्त झालेला...
तू उदास... अचानक रुसणारा...
तू अथांग... सगळे अपराध
पोटात घेणारा...
तू लाडका..तू माझा..माझा पाऊस..
पुन्हा पुन्हा बरसत येणारा...पुन्हा पुन्हा बरसत येणारा...
No comments:
Post a Comment