marathi blog vishwa

Saturday, 27 November 2010

जगणेच महाग..

गहू महाग, तांदूळ महाग ..चहा पिण्या साखर महाग..
तेल महाग तूप महाग ..आंघोळीचा साबण महाग..
 
पाणी महाग दूध महाग शेतीसाठी बियाणे महाग..
बैल महाग गाडी महाग पंपासाठी वीज महाग..
तक्रार सांगाया जावे तर ऐकणारे अधिकारी महाग..
 
मंत्र्यांची सदा ती  परदेशवारी तरीही एसटीचे तिकीट महाग..
घरी शांत बसू म्हटले तर राहण्यासाठी घरे महाग..
 
कार महाग रिक्षा महाग सावलीसाठी झाडे महाग..
जगण्याचाच येतो वीट परंतु जाळून घेण्या रॉकेल महाग..
-सुधांशु नाईक - २६/११/१०

2 comments: