समोर निळा सागर सारा
मनात आपुल्या रोज फुलावा
मयूराचा तो छान पिसारा..
लाल इथली तांबडी माती
कशी फुलवते भावूक प्रीती
कुणाकुणाचे आयुष्य उजळे
कुणाकुणाची जुळली नाती..
प्रत्येकाच्या पाठीवरती
कसले किती वळ
तरी येथील चंद्र तारे जगण्या देती बळ...
अस्वस्थ असुनी स्वस्थ रहावे
नाही खंत ना खेद कशाचा
जन्मा आलो मस्त जगावे खेळ समजुनी ईश्वराचा...
-- सुधांशु नाईक, कल्याण. २८/११/१०.
No comments:
Post a Comment