देवा तुझे होते सुंदर आकाश
आम्ही काळवंडली I त्याची निळाई II
सुंदर होती झाडे आणि सुंदर फुले
आम्ही तोडीयली I लोभापायी I
सुंदर तलाव सुंदर ती नदी
आम्ही नासवली I स्वार्थापायी II
सुंदर ती माती सुंदर ती नाती
आम्ही हरवली I पैशापायी II
असुंदर सारे कराया सुंदर
चालू नवी वाट I सुधा म्हणे.. II
--- सुधांशु नाईक , बहरीन. १४ /०९ /२०१२
Sadhya shabdat aprtim kavita , antarmukh karnari.
ReplyDeleteNisargavar eka maryade palikade maat karaycha manavane hatt sodla pahije. Nahitar adhogatich ..
thanx for comment..keep commenting..!
Delete