नवीन वर्षात काही चांगले घडावे
गल्ली ते दिल्ली सगळे सुंदर व्हावे..
कचरा अवघा साफ व्हावा
भ्रष्टाचाराचा नाश व्हावा..
जात धर्म अवघे विसरून जाऊ
भारतीय म्हणून सगळे एक होऊ..
गरिबाला पोटभर अन्न मिळावे
मजुराला पुरेसे काम मिळावे..
दहशतवादाला थारा न द्यावा..
देश आपला सक्षम व्हावा..
अंधार अवघा संपून जावो
जीवन अपुले उजळून येवो..
नवीन वर्ष सुखाचे जावो..
-- सुधांशु नाईक, कल्याण. - ०९८३३२९९७९१.
No comments:
Post a Comment