marathi blog vishwa

Monday 7 August 2023

मीरा बनी रे जोगनिया...

 #सुधा_म्हणे: मीरा बनी रे जोगनिया...

07  ऑगस्ट 23

 कृष्णप्रेमात अपार बुडालेली मीरा. भगवी साधी वस्त्रे परिधान केलेली, भजन गात नाचत आपल्याच नादात तल्लीन होऊन जाणारी मीरा ! तहान भूक विसरून ताना-मनाने कृष्णस्वरूप झालेली मीरा. ती आपल्याला कायम लोभस वाटते मात्र तिचं जगणं किती कष्टप्रद होतं हे तिनेच लिहून ठेवलं आहे.

 घर रा लोग मन्नेबावळी बतावै,

संग री सहेल्या म्हापे, आंगळी ऊठावे,

हँसी ऊडावे नाना टाबरिया, मीरा बनी रे जोगनीया,

अपने पीया की मीरा, बनी रे जोगनीयाँ।

 

सुख सारा छोड़िया मोहन थारां कारणे,

भगवा सा वेस करीया, आई थारे बारणे,

छोड़्या परिवार, छोड्या सासरीयां,

मीरा बनी रे जोगनीया, अपने पीया की,

मीरा बनी रे जोगनीयाँ।

घरातील सगळे मला वेडी म्हणतात. मला लागलेलं हे गोविंदनामाचे, कृष्णदर्शनाचे वेड त्यांना समजू शकत नाही. माझ्या मैत्रिणी पण माझी खिल्ली उडवतात. ज्याला कधी बघितलेच नाही, जो जिवंत आहे की नाही, जो एक खरी व्यक्ती तरी आहे का अशा कृष्णाची मनाला लागलेली आस त्यांना मोठा वेडपटपणा वाटतो. माझं जगणंच जणू जगाच्या रूढी रीती रिवाजाच्या विरुध्द. मी तर आता फक्त कृष्णाची जोगन बनून गेले आहे. सासर, घर, परिवार सगळं त्यागून ही मीरा आता जोगन झालीये. ती दुःख सोसते आहे, सगळ्या जगाकडे पाठ फिरवून त्याच्यासाठी आयुष्य पणाला लावले आहे पण त्या कृष्णाला मात्र हे अजून उमगत नाहीये. तो अजूनही तिला भेटत नाहीये. म्हणून मीरा म्हणते,

 चाहे जितने दुख देले, चाहे तू परख ले,

एक बात म्हारी तू, कान खोल सुण ले,

तू है मोहन मैं तेरी जोगनीया,

आवो नी पधारो, म्हारा साँवरिया,
म्हारा सांवरिया, मीरा बनी रे जोगनीया....

आपल्या प्रेमाची, भक्तीची त्याने कितीही परीक्षा घ्यावी, मीरा त्यासाठी तयार आहे इतकंच नव्हे तर ती जणू त्याला दरडावून म्हणते की, तू लक्ष देत नसलास तरी आता नीट कान देऊन ऐकच.. कितीही दुःख दिलीस तरी, मला काहीही सहन कराव लागलं तरी तूच माझा मोहन आणि मीच तुझी जोगन आहे.! मधुराभक्तीचे हे रूप आपल्याला मग स्तिमीत करते. आपण नतमस्तक होऊन जातो.

ss



 


3 comments:

  1. छान 👏👏👌

    ReplyDelete
  2. खुप छान लिहिलेस

    ReplyDelete
  3. मीरा ही निस्सीम भक्तीचे प्रतीक आहे. तिला कृष्णा भक्ती शिवाय दुसरे काही सुचत नाही.म्हणून ती म्हणते मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो ना कोई। जा के सिर मोर

    मुकुट मरो पती सो ही।

    ReplyDelete